वार्ताहर / मणेराजूरी
मणेराजूरीला दिवेंस – दिवस कोरोनाचा धोका वाढतच आहे. गेल्या तीन दिवसात गावात तब्बल बाराजण कोरोना पॉझीटिव्ह आले, तर दोघांचा मूत्यू झाल्याने पुन्हा गांवात भितीचे वातावरण आहे. गेल्या 26 जूलै पासून आज अखेर मणेराजूरीत तब्बल 37 रुग्ण सापडले असून यातील 18 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून सध्या 17 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज सायंकाळपर्यंत आणखी रुग्णांची यात भर पडणार आहे. तर ही कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षीय आपत्ती व्यवस्थापन समितीने गेल्या 24 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबरपर्यंत गाव लॉकडाऊन केले आहे. तर सोशल मिडियावर व तोंडी अफवा पसरविणाऱ्या कारवाई करण्याचा इशारा देणेत आला आहे. ‘ तर तासगांव नंतर मणेराजूरी रुग्णसंख्येत दुसऱ्या नंबरवर येवून हॉटस्पॉट बनत आहे.
सध्या वस्ती भागासह गावातही रुग्ण सापडल्याने ग्रामस्थामध्ये भिती आहे.या सर्वाच्या संपर्कातील स्टस्टिंगचे काम सुरु आहे. परंतु रुग्ण वाढल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. तरी स्वंयशिस्तीने ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, घाबरुन जावू नये व दुसऱ्यांना घाबरु नका ;कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थाबरोबर सर्व पदाधिकारी स्वंयसेवक यांचे सहकार्य आवश्यक आहे व त्यांनी आपआपल्या विभागात प्रबोधन करणे सध्या आवश्यक आहे ;तरी ग्रामस्थांनी घाबरुन न जाता कोणतेही कोरोना सदृष्य आजार लक्षणे आढल्यास ताबडतोब आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा ‘कोरोना ‘ प्रथम स्टेजला बराच होतो ;असे आवाहन ;मणेराजूरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितिन साळुंखे यांनी केले आहे .
आता झपाटयाने रुग्ण वाढत आहेत ;आतातरी गावातील नागरिकांनी स्वतःची व कुंंटूबियांची काळजी घ्यावी मास्क वापरावा ; गर्दी करू नये : कोणतीही अफवा पसरुवू नये ;सॅनिटाईझर व मास्कचा वापर करावा ;व कोरोनाला आपल्या कुंटूब व गावापासून दूर ठेवूया ;गावातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे ; हा आजार कोणीही चेष्टेवारी नेवू नये ;असे आवाहन सरपंच सदाशिव कलढोणे यांनी केले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








