मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरीत दोन गव्या रेडयांचा धुमाकूळ जंगली गव्यांच्या दर्शनाने मणेराजूरीसह परिसरात खळबळ उडाली आहे ; रविवारी दुपारपासून वन विभागाकडून शोध मोहीम सुरु आहे ;परंतु अद्याप हे गवे रेडे सापडले नाहीत .
याबाबत समजलेली माहिती अशी की ;मणेराजूरीतील गव्हाण रोडवरील जमदाडे वस्तीवर( खैराटी भाग ) एकजणांचा द्राक्ष बागेत रविवारी सकाळी सहाच्या दरम्यानदोन गवे रेडे बसलेले दिसले ;या वस्तीवरील दोघे युवक बागेत काम करण्यासाठी गेले असता त्यांनी ते पाहिले ;प्रथम:त त्यांना कुणाच्या तरी म्हशी असतील म्हणून त्यांना हुसकाविन्याचा प्रयत्न केला पण वार्याच्या वेगाने ते त्यांच्या अंगावर धावून आले ;त्या युवकांनी कसाबसा तेथून पळ काढला ;या गव्या रेडयांनी येथील असणाऱ्या तलावाकडे धावत गेले परंतु दुपारी परत हे गवे अनेक बागांच्या नासधूस करत पळत होते.
यामध्ये अनेक बागांचे ‘ ड्रीप ;स्टे ;मुख्य साईट तार आदींचे मोठे नुकसान झाले; ही माहिती वनविभागाला कळविणेत आली या विभागाचे पथकाने दुपारी चारनंतर युद्धपातळीवर या गव्यांची शोधमोहीम सुरू केली असून ;सायंकाळी सात वाजेपर्यंत तरी हे गवे मिळून आले नाहीत. गव्यांच्या दर्शनाने मात्र मणेराजूरी सह परिसरातील घबराहाटीचे वातावरण आहे ;या गव्यांनी अद्याप तरी कोणत्या प्राणी अथवा मनुष्याला इजा केली नाही.








