प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील भोसे येथे आरबीएल बँक फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चोरट्यांच्या हाती रक्कम लागली नाही. त्यामुळे चोरट्यांनी बँकेतील काही साहित्याची तोडफोड केली. गुरूवारी सकाळी बँक उघडल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
आरबीएल बँकेची शाखा भोसे गावात मुख्य चौकात आहे. चोरट्यांनी किरकोळ चोऱ्यांबरोबर बँकांना लक्ष केल्याने ग्रामीण भागात घबराट आहे. चोरट्यांनी चोरीच्या प्रयत्नात बँकेतील साहित्याची तोडफोड करुन दोन हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद बँकेच्या व्यवस्थापकाने ग्रामीण पोलिसात दिली आहे.








