प्रतिनिधी / भिलवडी
भिलवडी मतदान केंद्रावर पोलिसांच्या ढिसाळ बंदोबस्तामुळे केंद्रावर मतदारांच्या व्यतीरीक्त कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्ज झाल्यानंतर मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली व मतदारांना मतदान करण्यास सुसज्यता आली.
भिलवडी अंकलखोप या दोन्ही जि.प. गटामध्ये ३९४o मतदान असून दिवसभरामध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या तर अनेक कर्यकर्त्य व नेते मंडळी या केंद्रावर गर्दी करीत होते. शंभर मीटर अंतराच्या या केंद्रावर पुरता फज्या उडाला होता. पोलिसांच्या समोरच मोठ मोठे जमाव करुन गर्दी होती. मतदारांना मतदान करणे आडचणीचे ठरत आसताना अनेक तक्रारी नंतर पोलिसांनी गर्दी पांगवीताना लाठी चार्ज केला. हि माहीती वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना समजताच घटना ठिकाणी तासगांव उपविभागीय आधिकारी आश्विनी शेंडगे यांनी केंद्रास भेट देऊन पोलिस बंदोबस्त शिस्तबध्द केला. शंभर मीटरच्या बाहेर नागरीकांना स्थांबविले.








