समस्त परिसराचे लक्ष लागून राहीले
वार्ताहर / भिलवडी
सत्ताधारी भाजपा परिवर्तन पॅनेलचा पराभव करीत काँग्रेस ग्रामविकास खंडोंबा पॅनेलने १३ जागा जिंकून भिलवडी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली. सत्तेनंतर नवनिर्वाचित सदस्य मंडळांने गावात विकास कामांना गती देत विकास साधण्याचा ध्यास धरला आहे. परंतु ज्या पॅनेलची सत्ता त्यांचेच जनसेवक स्थानिक संस्थांच्यावर अध्यक्ष होत आसतात परंतु तंटामुक्ती, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण, स्वच्छता अश्या विविध कमीटीचे अध्यक्ष पहिल्या ग्रामसभेसमोर निवडले जातात.
या सर्व समित्यांपैकी तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्षपदासाठी अनेक प्रमुखांच्यासह कार्यकार्त्यांनी जोर धरलेला दिसत आहे. अनेकांनी प्रमूख नेत्यांच्याकडे फिल्डींग ही लावलेली आहे तर अनेक जन चर्चेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेत्यांच्या समोर पुन्हा पेच निर्णाण झाला आहे. नाव कोणाचे घ्यायचे तर नारज कार्यकर्त्यांचे करायाचे काय ? त्यांना कोठे संधी दयायची हा फार मोठा डोकेदुखी पणा ठरत आहे.








