महापौर पदासाठी हालचाली गतिमान
प्रतिनिधी/सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी राजीनामा दिला. महापौर गीता सुतार तसेच पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे – म्हैसाळकर यांच्याकडे पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्याचे बावडेकर यांनी सांगितले. दरम्यान विद्यमान महापौरांची मुदत येत्या ८ फेब्रुवारी संपत आहे. बावडेकर महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर गटनेते पदाची सूत्रे बावडेकर यांच्याकडे देण्यात आली होती. गेल्या अडीच वर्षात गटनेते पदाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पडली होती. दरम्यान महापौर पदाची निवड तोंडावर आली असताना बावडेकर यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण खळबळ उडाली. दरम्यान पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला असून महापौर पदासाठी आपण प्रबळ इच्छुक असल्याचे बावडेकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








