सांगली : प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक विनायक सिंहासने यांची निवड करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. यामध्ये एकमताने सिंहासने यांच्या नांवावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवडी नंतर महापालिकेत महापौर गीता सुतार यांनी सिंहासने यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाशतात्या बिरजे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेविका लक्ष्मीताई सरगर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, नगरसेवक अजिंक्य पाटील, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेवक इम्रान शेख आदी उपस्थित होते
Previous Articleकरवीर तालुक्यात ६६ गावात होणार खुल्या प्रवर्गातील सरपंच
Next Article मिरजेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन








