वार्ताहर / वसगडे
सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील ८ ऑगस्ट २०१९ हा दिवस काळाकुट्ट दिवस म्हणून नोंद झाला आहे. महापुराच्या भयाने बोटीत बसून कृष्णापार करणाऱ्या १७ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. बोट न मिळणे यासाठी एक कारण होते. त्याला वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा परिषदेकडून गावात बोट दाखल झाली आहे. त्यामुळे ब्रम्हनाळ ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
स्वकीय गमावल्याचे दुःख कमी झाले नसले तरी किमान ऐन उपयोगाच्या वेळी गावात सुधारणा घडत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र गावाला कायमचे संकटातून मुक्त होण्याची प्रतीक्षा आहे.
जि.प.सदस्य सुरेंन्द्र वाळवेकर, माजी जि. प.अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन १८ आसनी यांत्रीक बोट अखेर ब्रम्हनाळ मध्ये दाखल झाली आहे.
माजी सरपंच अशोक पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव गडदे, सचिन पाटील, गणेश गावडे यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणेसाठी ही बोट गावात दाखली झाली आहे. जेष्ठ नेते सुभाष वडेर, प्रशांत बंडगर,महेश गावडे, हेमंत जगदाळे, अरुण गावडे,दादासो गावडे, कृष्णा विसापूरकर,स्वप्निल सुतार, रामकृष्ण येळावकर, दिलीप चौगुले या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोटीसाठी सतत पाठपुरावा केला होता.
ऑगस्ट २०१९ च्या पहिल्या आठवड्यामध्ये संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला महापुराने वेढा दिला होता. पाण्याची पातळी झपाट्याने वाढु लागल्याने नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण होते. नदीकाठावर वसलेल्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये घरा घरात पाणी शिरु लागले होते. शेवटी न राहुन ग्रामस्थांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दोन किलो मिटरचा टप्पा गाठुन बोटी ने सोडण्याचा प्रवास सुरु झाला मात्र ८ ऑगष्ट रोजी सकाळी बोट उलटल्याने १७ निष्पाप जिवांना आपला जिव गमवावा लागला. त्यानंतर यंत्रणा जागी झाली. महायुती सरकारला जाग आली. शासकीय तसेच वैयक्तिक मदतीच ओघ पूर्ण महाराष्ट्रातुन सुरु झाला. पुरग्रस्त इतर गावा बरोबर ब्रम्हनाळ पूर्व पदावर आले. पुर ओसरल्यानंतर पुरातुन बाहेर पडण्यासाठी रस्त्याची उंची वाढविण्याकरिता प्रस्ताव माजी महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले मात्र काम सुरू झाले नाही. नव्या सरकारनेही काही अद्याप निधी दिला नाही. बोट दुर्घटनेतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडलेला हमरस्ता अद्याप दुरावस्थेतच असला तरी बोट दुर्घटनेच्या पुर्वसंध्येला १८ आसनी यांत्रीकी बोट ब्रम्हनाळ मध्ये दाखल झाली. याचा आनंद झाल्याने ग्रामस्थानी वाजत गाजत महिलांनी ओवाळुन स्वागत केल आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








