वार्ताहर / कसबे डिग्रज
सांगली ते भिलवडीपर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमीच मगरींचा वावर असल्याचे दिसते. गेल्या दोन तीन दिवसांपासून बिबट्याची दहशत असतानाच कृष्णा नदीकाठी कसबे डिग्रज ते सांगलवाडी या परिसरात मंगळवारी मगरीचे दर्शन झाले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आधीच बिबट्याच्या दहशतीमुळे नदीकाठावरील शेतकरी, नागरिक आधीच हैराण झाले असतानाच आता नदीकाठी मगरींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सांगली नवीन ब्रिजच्या अलीकडे सांगलीवाडी जवळ, कसबे डिग्रज पोटमळी परिसर तसेच सुखवाडी ब्रम्हणाळ डोह परिसरात मोठया प्रमाणात मगरी विसावत आहे.








