30 ऑक्टोबर शेवटची मुदत
आटपाडी / प्रतिनिधी
इयत्ता १ ली ते १२वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या व आई-वडीलांपैकी एकजण मयत असलेल्या मुलांना बाल संगोपन योजनेतर्गत शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग-१ यांच्याकडुन सदरची योजना राबविली जात असुन त्यासाठी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले आहे.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी वर्ग १ यांच्याकडून आई किंवा वडीलांपैकी एकाचा मृत्यू झालेल्या व बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्याची सर्वसामान्यांना विशेष माहितीच दिली जात नाही. आत्ताही सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकाना अर्ज सादर करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत आहे. सदर योजनेसाठी गरजुनी तात्काळ कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहनही माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले आहे.








