बागणी / वार्ताहर
बागणी नागाव रोडवर भरधाव येणाऱ्या डंपरने रस्त्याकडेला चरणाऱ्या रेडकाला उडवले. नेहमीच या रस्त्याने भरधाव डंपर येत असतात यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांना देखील जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पोखर्णी भागातून रात्री व दिवसा देखील मोठ्या प्रमाणात मुरूम व दगडांची चोरटी वाहतूक होत असते. हे डंपर चालक कोणाला घाबरत नाहीत. आम्हीं हप्ते देतोय त्यामुळे अधिकारी कोणी आम्हाला अडवू शकत नाहीत, अशा भाषेत हे डंपर चालक नेहमी वावरत असतात. नागाव रस्त्याकडेला दोन बिअरबार आहेत. शाळेला ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील मोठी गर्दी असते. अनेक लोक या रोड लगत शेतात घर बांधून राहण्यास देखील आहेत. त्यामुळे त्यांची देखील कामानिमित्त बागणी गावात ये -जा असते.
सध्या या रस्त्याच्या दुतर्फा कडा देखील खराब झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. सध्या या भागातील रहिवाशी लोकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या बेधुंद डंपर चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









