वार्ताहर/बोरगाव
वाळवा तालुक्यातील बहे येथे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास सहकार्य व खबरदारी म्हणून गावातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव काळातील खर्चास फाटा देऊन त्याच रक्कमेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्याचा मानस सर्वच मंडळानी केला. हा निर्णय सरपंच छायाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
गावाने घेतलेल्या निर्णयाचा इतर गावांनी आदर्श घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा मंडळांच्या कडून व्यक्त करण्यात आली. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याचे काम प्रभावीपणे होईल. संकटामध्ये एक चांगला आदर्श गावाने घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निर्णयाला सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एक मुखाने संमती दर्शवली.
तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने या निर्णयाबद्दल मंडळांच्या अध्यक्षांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील यांनी केले व आभार प्रा शशिकांत पाटील यांनी मानले
यावेळी सरपंच छायाताई पाटील, उपसरपंच प्रा सुवर्णाताई पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हणमंत पाटील, माजी उपसरपंच मनोजकुमार पाटील, शिवाजी पाटील, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, रोहित तोरस्कर, बबनराव शिरतोडे, राजाराम थोरात, प्रवीण फले, दिनकर पाटील, जालिंदर देशमुख, हणमंत पाचुंब्रे, अरविंद थोरात, अधिक मोहिते यांच्यासह सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleसांगली : वसुलीसाठी तगादा, करगणीतील महिला सावकारवर गुन्हा
Next Article रत्नागिरीत कोरोनाचे पाच बळी








