सापडलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी केली परत
दिघंची/वार्ताहर
सध्याच्या जगात प्रामाणिक असणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.परंतु आज देखील प्रामाणिकपणा जपणारी लोकं आहेत.त्याचा प्रत्यय दिघंची येथे आला.दि विटा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दिघंची शाखेमधील कर्मचाऱ्यांनी सापडलेली सोन्याची सुमारे एक तोळे वजन असणारी सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत केली.
बँकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये सोने तारण बांधण्यासाठी शाखाधिकारी सुनील देशपांडे व कर्मचारी राहुल नागणे हे गेले असता त्यांना एक तोळे सोन्याची अंगठी आढळून आली. त्यावेळी त्यांनी या अंगठी मालकाचा शोध घेतला असता सदर अंगठी खवासपूर येथील आण्णा शिवाजी भोसले यांची असल्याचे निष्पन्न झाले. संबंधीत अंगठी मालक आण्णा भोसले यांना बँकेत बोलवून त्यांना सोन्याची अंगठी त्यांच्या सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी शाखा सल्लागार डॉक्टर प्रशांत रावण, शकील तांबोळी ,शाखा अधिकारी सुनील देशपांडे , शकील तांबोळी , वैभव शिनगारे , विशाल माळी ,उर्मिला रमेश मोरे , राहुल सिताराम नागणे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








