प्रतिनिधी / सांगली
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने लावण्यात आलेले निर्बंध आणि रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी गुरुवारी सांगलीमध्ये पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
विना मास्क फिरणाऱ्या अनेक लोकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने शहरामध्ये पायी फिरून कारवाईला प्रारंभ केला. तसेच माधवनगर रोड, कॉलेज कॉर्नर, स्टेशन चौक आदी ठिकाणी नाकाबंदी कडक करण्यात आली आहे.








