डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या स्वखर्चातून चौक सुशोभीकरण
प्रतिनिधी / सांगली
पुष्पराज चौकातील पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे 1989साली अनावरण झाले असून त्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेची परवानगी घेऊन सांगलीतील डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी स्वखर्चातून सात लाख रुपये खर्च केला आहे.
या चौकातील कटड्यास रेड कलरच्या फायर विटा 600 कि.मी.मेंगलोर कर्नाटक वरून मागवण्यात आल्या आहेत या विटांवर हवामानाचा परिणाम कमी होतो. त्यामुळे या विटांचा बराच कालावधी आहे व त्यामध्ये प्लेविंग ब्लॉक, रोलिंग ग्रॅनाईट व लॉन असे सुशोभीकरण होणार आहे हे सर्व काम डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या स्वखर्चातून होणार आहे व लवकरच हे काम पूर्ण होईल असे आर्किटेक सनी मेहतर यांनी माहिती दिली
Previous Articleधक्कादायक ! तीन दिवस भावाच्या मृतदेहासोबत राहिली मनोरुग्ण बहिण
Next Article तासगावात एकाच कुटुंबातील 11 कोरोना पॉझिटिव्ह








