प्रतिनिधी / आटपाडी
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी खासदार संजयकाका पाटील ,आमदार अनिलभाऊ बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार देण्याच्या व उपाययोजनांबाबत चर्चा करून त्याबाबत प्रशासनाला पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी निर्देश दिले.
आटपाडी तहसील कार्यालयामध्ये गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीला अमरसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यात किती बेड उपलब्ध आहेत याचा आढावा घेत अजून नवीन बेड तयार करण्याचे निर्दश प्रशासनाला दिले व आटपाडी तालुक्यासाठी नवीन व्हेंटिलेटर व बायपॅप मशीन तसेच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था तात्काळ करू अशी ग्वाही दिली. तसेच ए एन एम व जी एन एम चा कोर्स झालेल्या महिलांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर रोजगार द्या या अनिता पाटील यांच्या मागणीला जयंतराव पाटील यांनी तात्काळ प्रतिसाद देत तशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच खरसुंडी आरोग्य केंद्रातील बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्याची मागणी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केली. तर तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांनी कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी केली.
यावेळी आटपाडी तालुक्यासाठी कोणत्याही गटातटाचा, पक्षाचा विचार न करता सर्वच पक्षाचे नेते ,कार्यकर्ते ,पदाधिकारी कोरोना काळात योग्य त्या उपाययोजना व तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आग्रही असल्याचे समाधानकारक चित्र या निमित्ताने जाणवले. यावेळी विविध संघटना व सामाजिक करीकर्त्यांनी विविध प्रश्नावर पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे निवेदने दिली व विविध मागण्या केल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








