प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील पारे येथे यात्रेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना सोमवार 13 एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस मारूती गणपती हजारे यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, पारे येथे ग्रामदैवत दरगोबा देवाची यात्रा होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास दरगोबा देवाच्या मंदिरात वीस ते बावीस लोक दरगोबाच्या पालखी सोहळ्यासाठी जमले होते. त्यांना पोलिस पाटील व पोलिसांनी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिका-यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याचे सांगितले. मंदिरातून लोकांना घरी जाण्याबाबत सूचना केल्या. तरी देखील या लोकांनी दरगोबा मंदिरातून पालखी मिताबाई मंदिराकडे वाजत नेऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कोरोना विषाणामुळे मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी परशराम गणपती कोरे, शहाजी पांडुरंग साळुंखे, कृष्णात महादेव साळुंखे, विश्वनाथ शिवकांत जंगम, कृष्णात रामचंद्र शिंदे, प्रदिप वसंत साळुंखे, अनिस जाफर मुलाणी, अनिकेत कृष्णात शिंदे, तात्यासो शंकर शिंदे, गंगाधर शिवकांत जंगम, राजेंद्र दशरथ माने, प्रकाश तानाजी सुर्यवंशी, राजेंद्र उर्फ शंकर संभाजी सुतार, महादेव बाळासो पुजारी, प्रविण कृष्णात शिंदे, संतोष रामचंद्र पुजारी, अविनाश हणमंत मोहिते, लक्ष्मी बाळासो पुजारी, आशाराणी किरण मुतकुडे, आबासो कृष्णा आदाटे, पुनम हणमंत मोहिते, राजेंद्र विलास साळुंखे ( सर्व पारे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस मारूती गणपती हजारे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव







