प्रतिनिधी / कडेगांव
कडेगांव शहरात दिवसेंदिस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. रुग्ण संख्या तीनशेच्या जवळ पोहचली आहे. वाढती रुग्ण संख्या धोकादायका ठरत असल्याने गुरुवार ( दि 29 एप्रिल ते 5 मे ) अखेर शहरातील दवाखाने, औषध दुकाने, दूध संकलन वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याची माहिती शहर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.
कडेगांव येथील नगरपंचायतमध्ये नगरसेवक नगरपंचायत प्रशासन, व्यापारी, भाजी विक्रेते व लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, कडेगांव शहर आपत्ती व्यवस्थापन समित यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली .यामध्ये हा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेतील केवळ दवाखाने व मेडिकल अन्य सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात दिवस बंद राहणार आहेत. तसेच शहरात कोणालाही फिरून भाजी वगैरे विक्री करता येणार नाही. तर या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. विनाकारण फिरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तेंव्हा सर्वांनी जनता कर्फ्युचे पालन करावे व स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कडेगांव शहर आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आले आहे.