विवस्त्र करून केली होती मारहाण, न्यायालयीन कोठडीत रवानगी
प्रतिनिधी/मिरज
पत्नीच्या विनयभंग प्रकरणी माजी नगरसेवक अशोक कांबळे याच्यासह त्याच्या दुसऱ्या पत्नीला सोमवारी मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसऱ्या पत्नीकडे रहायला गेल्यानंतर पहिल्या पत्नीने भांडण काढले असता तिला सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करून कांबळे याने मारहाण केली होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अशोक कांबळे हा दुसऱ्या पत्नीकडे राहत असल्याच्या कारणावरून पहिल्या पत्नीने भांडण काढले होते. घरी चला अशी विनवणी करीत असताना अशोक याने पत्नीला सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करून मारहाण केली होती. 14 जून रोजी त्याच्यावर मिरज शहर पोलिसात वियनभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. अखेर 15 दिवसानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








