प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील बेळंकी गावात जिल्हा पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी अण्णासाहेब गवाणे यांनी त्यांचा मुलगा महेश आणि पत्नीसह बेळंकी गावात आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. शेअर बाजारातील व्यवहारातून कर्जबाजारी झाल्याने ही आत्महत्या घडल्याचे सांगितले जात आहे.
सेवा निवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे (वय 65), पत्नी मालन अण्णासो गव्हाणे (वय 50) आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. सांगली जिल्हा पोलिस दलात गोपनीय शाखेचे पोलिस म्हणून गव्हाणे यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली होती.
या तिघांनी पहाटे उटून आंघोळ, देवपुजा उरकून गळफास लावून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. शेअर मार्केट मधून प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.








