प्रतिनिधी / शिराळा
शिराळा नगरीत नाट्यगृह व्हावे. यासाठी शिराळा सांस्कृतिक कलामंचने पुढाकार घेतला आहे. शिराळा शहरामध्ये नाट्यगृह स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी शिराळा तालुका सांस्कृतिक कला मंचच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता निकम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिराळा सांस्कृतिक कलामंचचे अध्यक्ष विक्रम दाभाडे, सांगली जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिति सदस्य अनंत सपकाळ, आ. भा. म.चित्रपट महामंडळ भरारी पथक समिती सदस्य मराठी सिने अभिनेते रंगराव घागरे, बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम् अभिनेता विनायक चव्हाण आणि शिराळा सांस्कृतिक कलामंचचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.