प्रतिनिधी/नांद्रे
नांद्रे (ता. मिरज) येथील नेंमगोंडा उप्पाध्ये यांना सकाळच्या सुमारास शेतात गव्याचा वावर दिसून आला. उप्पाध्ये यांना गवा दिसताच ते भयभीत होऊन पळत सुटले. यानंतर त्यांनी शेतात गव्याचा वावर असल्याची मीहिती गावकऱ्यांना दिली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी 7 च्या दरम्यान बिसूर मागे गवा नांद्रेयात आल्याचे अनेकांनी पाहिले. हा गवा ऊस क्षेञातून फिरत असल्याने शेती पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. यातच कोरोना, लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटाच्या खाईत गेला असतानाच गव्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वनविभागाने याची तात्काळ दखल घेत या गव्याचा बदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








