प्रतिनिधी/नांद्रे
सन 2019 महापूर, 2020, 2021 मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या अस्मानी संकट आणि महामारीमुळे आर्थिक चक्र थांबल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच यंदाच्या संभाव्य महापूरांची टागती तलवार कायम आहे. मात्र, अजूनही सन 2019च्या महापूरातील बांधीत कुंटूबे, छोटे व्यापारी, शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
2019 च्या महापुरात झालेले नुकसान मोठे होते. महापूराच्या या तडाख्यात अनेक कुंटूबे उध्दस्त झाली. महापूरावेळी गावातील नेते, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था, आरोग्य विभाग व आदी सामाजिक संस्थानी विशेष कामगिरी करत लोकांना धीर दिला. मात्र मिरज तालुक्यातील काही नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला आहे. गावकामगार तलाठ्याच्या मणमाऩी कारभारामुळे गावातील अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित पूरग्रस्त करत आहेत. पालकमंञी जयंत पाटील, कुषीमंञी बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी यांनी या बाबत विशेष लक्ष घालावे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








