वार्ताहर / बागणी
बागणी येथील हेमा पतकी यांची नात नभा अनंत नेरकर वय वर्षे अवघे १ वर्ष ८ महिने हिने आपल्या हुशारीने सर्वांना अचंमबीत करून टाकले आहे. या लहान वयात तीने अनेकांना भुरळ घातली आहे. या तिच्या गुण विशेषाणे तिची इंडिया बुकने दखल घेतली आहे. व तिचे नाव नोंद झाले आहे.
या बाबत अधिक माहिती देताना हेमा पतकी म्हणाल्या नभा एवढ्या लहान वयात १४ प्रकारच्या भाज्या ओळखते,१० फळांची नावे सांगून त्यांना ओळखते, शरीराच्या अवयवांची नावे ओळखते, तसेच ए टू झेड सर्व एबी सीडी म्हणते, अनेक पक्षांचा व प्राण्यांचा आवाज ओळखते व काढते, घरातील सर्व वस्तूंची नावे सांगते व अन्न पदार्थ ओळखते, गाणी म्हणते सर्वांशी नम्रतेने बोलते व सर्वांचे लक्ष वेधून घेत घरी येणाऱ्यांची स्वागत करते. आशा एक ना अनेक गोष्टी ती दररोज करत असते त्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तिच्या असणाऱ्या गुणांची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेत तिला सन्मानित करत रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली आहे. या तिच्या गुणविशेषा मुळे व रेकॉर्ड केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








