प्रतिनिधी / कडेगाव
कडेगांव नगर पंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या आणि संघर्ष समितीच्या वतीने वारंवार शासनाचे लक्ष वेधण्यात आले, परंतु परिपूर्णरित्या न.पं.कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. यासाठी शासन उदासीन असून पुन्हा एकदा आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संघटनेने १७ ऑगस्टला एकदिवसीय कामबंद आंदोलन व राजव्यापी संप पुकारला असल्याची माहिती सांगली जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सदानंद दोडके यांनी दिला होता.कडेगांव नगरपंचायतीच्या कामगारांनी एक दिवसीय बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.
सफाई कामगारांना पदोन्नती व मोफत घरे बांधून देणे, सफाई कामगार , पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला देणे ,६ संवर्गाच्या निवड श्रेणी पुनर्जीवित करणे निवड श्रेणी पदांना आदींना राजपत्रित दर्जा देणे, ,सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखणे , शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०० टक्के वेतन कोषागार मार्फत देणे ,नगरपंचायतीच्या लोकसंख्येनुसार व आवश्यक पदानुसार आकृतिबंध आराखडा तयार करणे, नगरपंचायत कर्मचारी समावेश करून वेतनाचा लाभ देणे , रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या समावेशांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे , सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देऊन वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे, लाड/पागे कमिशनच्या शिफारशीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे,५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे सफाई कामगारांची भरती करणे तसेच इतर विभागातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदावर संधी उपलब्ध करून तात्काळ वेतन श्रेणी लागू करणे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन वेतन श्रेणी लागू करणे,नगर पंचायत कोट्यातील २५ % जागांसाठी परिक्षेविना पात्र कर्मचाऱ्यांमधून समावेशनाने भरती करून घेणे ,अनुकंपा धारकांना नेमणूका देणे, यासह विविध मागण्यांसाठी हा एकदिवशीय संप पुकारला होता.
या राजव्यापी संपच्या यशस्वीतेसाठी कडेगांव नगर पंचायतीचे सदानंद दोडके,रमाकांत शितोळे,रामेश्र्वर मोरे,मुनिर पिरजादे,श्रीकांत मिसाळ,संदिप माळी,वर्षा धर्मे,शरद मिसाळ महेश मिरजकर आदी कर्मचारी व संघटनेचे नेते परिश्रम घेत आहेत. शासनाने आपल्या सर्व मागण्यांवर नगरपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून ५ऑक्टोबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ होईल. असे कडेगांव नगरपंचायतीचे कर्मचारी रमाकांत शितोळे यांनी इशारा नगरपंचायतीला दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








