प्रतिनिधी / सांगली
लॉकडाऊन पासून बंद असणारी मंदिरे, प्रार्थना स्थळे दिवाळीपूर्वी सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जनतेची श्रद्धास्थाने असणारी धार्मिक स्थळे गेल्या ८ महिन्यांपासून बंद आहेत. इतर राज्यांमध्ये बऱ्याच अंशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रामध्ये अद्यापही धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे पूजा-साहित्य विक्रेते, हारफुले-प्रसाद विक्रेते, देवस्थानाचे सेवेकरी, देवस्थानातील कर्मचारी वर्ग यांच्यावर गेल्या ८ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आलेली आहे.
मंदिरे बंद असल्यामुळे वरील लोकांची आर्थिक चक्रे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. याच्या निषेधार्थ अध्यात्मिक सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दिवाळीच्या आत सर्व धार्मिक स्थळे सुरु करावीत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
यावेळी आध्यत्मिक सेलचे अध्यक्ष ह.भ.प. अजयकुमार वाले, ह.भ.प. निशिकांत शेटे महाराज, माजी आमदार नितीन शिंदे, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेवक सुब्राव मद्रासी, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, मोहन जामदार, सलीम पन्हाळकर, अशोक पवार, गौस पठाण, चंद्रकांत बेलवलकर, ज्ञानेश्वर पोतदार, वैशाली पाटील, शैलजा कोळी, प्रियानंद कांबळे, रवींद्र ताम्हनकर, जगदीश खाडिलकर, अजित ठोंबरे, अनिकेत पिसे, सदाशिव गुरव, अनंत गुरव, उत्तम शिवाजी ठोंबरे, शशिकांत गुरव उपस्थित होते.








