वार्ताहर / दिघंची
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे दोन दिवसात कोरोना चे तब्बल 19 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी दिघंची मध्ये चार रुग्ण आढळून आल्याने आता एकूण रुग्णसंख्या 23 झाली आहे.रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये गुरूवारी सहा आणि शुक्रवारी 13 रुग्ण आढळून आले असून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.
सुरुवातीला दिघंचीमध्ये कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनासोबत दिघंची ग्रामपंचायत ने जनता कर्फ्यु ,प्रबोधनासह अनेक उपाययोजना केल्या. गावकऱ्यांनी व व्यापारी बंधूनी केलेल्या सहकार्याने आत्ता पर्यंत दिघंची गावामध्ये तीन च रुग्ण आढळून आले होते.गुरुवारी व शुक्रवारी केलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये तब्बल 19 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिघंचीची बाजारपेठ आटपाडी तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून परिचित आहे.
सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील गावातील लोकांचा दिघंची गावामध्ये संपर्क असतो.त्यामुळे अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावामध्ये चार दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आलेला असून व्यापाऱ्यांनी गावाची काळजी म्हणून चार दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.बाजारपेठ मोठी व तीन जिल्हयातील लोकांचा वावर असल्याने जनता कर्फ्युचा पर्याय नागरिकांनी निवडला आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी पुढे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून आपली कोविड तपासणी करावी असे आवाहन दिघंचीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे व आरोग्य अधिकारी डॉ विनायक पवार यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








