दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक झाला. शुक्रवारी एकाच दिवशी 19 रुग्ण आढळून आल्याने दिघंचीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिघंची येथील एकूण रुग्णसंख्या 64 एवढी झाली आहे.
यापूर्वी डिझाईनची मध्ये एकूण 45 रुग्ण बाधित झाले होते. त्यामधील बरेच रुग्ण पूर्ण मुक्त होऊन घरी देखील आले आहेत. परंतु शुक्रवारी एकाच दिवशी 19 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा मोठा उद्रेक दिघंचीमध्ये झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची साखळी तुटली म्हणून दिघंचीमध्ये जनता कर्फ्यू देखील लावण्यात आला होता.परंतु एकाच दिवशी 19 रुग्ण सापडल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानकपणे एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्यामुळे दिघंची मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.मास्क चा वापर करा. शासकीय नियमांची अंमलबजावणी करून सोशल डिस्टन्सचा वापर करावा व वेळोवेळी सैनी टायझरचा वापर करावा कारण नसताना घराबाहेर पडू नका. अशी असे आवाहन दिघंची चे सरपंच अमोल मोरे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक पवार यांनी नागरिकांना केले आहे.
Previous Articleऍक्सेंचरकडून 5 टक्के कर्मचारी कपात
Next Article स्कोडाच्या रॅपिड एटी कारचे बुकिंग सुरू








