प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरातील वरचे गल्ली परिसरातील एका 68 वर्षीय व्यक्तीचा तसेच मुस्लिम मोहल्ला येथील 40 वर्षीय एका व्यक्तीचा अशा दोघांचा कोरोना ने मृत्यू झाला आहे. तासगावमध्ये आतापर्यंत एकूण सतरा जणांचा बळी गेला आहे. शहरात गुरुवारी एका दिवसात 14 कोरोना बाधित रुग्ण सापडले,त्यामध्ये माळी गल्ली, गुरुवार पेठ कुंभार गल्ली, वृंदावन कॉलनी येथे प्रत्येकी एक शिंदे गल्ली येथे दोन, सोमवार पेठ 1, पटवर्धन कॉलनी 2, दाणे गल्ली दोन, व सहारा कॉलनी येथील एकाच कुटुंबातील तिघांना अशा एकूण 14 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तालुक्यात एकूण 274 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत तालुक्यातील असलेले मृत्यूचे प्रमाण हे आवाक करणारे असून हे प्रमाण या भागात सर्वाधिक असेच असल्याचे दिसून येत आहे.
Previous Articleसोलापूर : माढा तालुक्यात नवे ३३ कोरोना बाधित
Next Article कोल्हापूर : पेठ वडगावात कोरोना रुग्णसंख्या १२५ वर








