प्रतिनिधी / सांगली
‘द फार्म आणि होय आम्ही शेतकरी’ या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जुगाड स्पर्धेत उंबरगावच्या आशिष सावंत याने महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकवला. यापूर्वी देखील आशिष सावंतने बंद पडलेल्या दुचाकीचा वापर करून सौर ऊर्जेवर चालणारी चारचाकी बनवली होती.
आशिष सावंतने बहुउद्देशीय शेती मशीन बनवून या जुगाड स्पर्धेत त्याचे उत्तम सादरीकरण केले.या मशीन पासून बागेत फवारणी करणे, दुधाचे कॅन वाहून नेणे, तसेच जनावरांचा चारा, पेंडीचे पोते वाहून नेणे आदी कामासाठी हे मशीन उपयोगी येते. या उपकरणासाठी आशिष सावंत याला शासकीय आयटीआय कॉलेज तसेच राजू चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.








