713 जणांची कोरोनावर मातः मनपा क्षेत्रात 197 वाढलेः ग्रामीण भागात 650 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिल्हय़ात नवीन 847 रूग्ण वाढले आहेत. तर 713 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 42 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 41 आणि परजिल्हय़ातील एकाचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 893 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रूग्णांची संख्या 13 हजार 805 झाली आहे.
महापालिका क्षेत्रात 197 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन रूग्ण मोठय़ासंख्येने वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात 197 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 137 तर मिरज शहरात 60 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 10 हजार 624 झाली आहे.
ग्रामीण भागात 650 रूग्ण वाढले
सोमवारी ग्रामीण भागात 650 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 55, जत तालुक्यात 30, कडेगाव तालुक्यात 51 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 62, खानापूर तालुक्यात 70, मिरज तालुक्यात 93 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 52, शिराळा तालुक्यात 56, तासगाव तालुक्यात 63 आणि वाळवा तालुक्यात 118 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 41 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 41 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन, खानापूर तालुक्यातील तीन आणि मिरज ग्रामीण भागातील सात जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील तिघांचा तासगाव तालुक्यातील दोघांचा, शिराळा तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण 41 जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 893 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया एकाचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हय़ातील कराड येथील 75 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 137 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
713 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही मोठयाप्रमाणात वाढत चालली आहे. सोमवारी एकाच दिवसांत 713 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील 13 हजार 805 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्हापरिषदेचे विरोधी पक्षनेते शरद लाड पॉझिटिव्ह
जिल्हापरिषदेचे विरोधी पक्षनेते शरद लाड यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसेच जिल्हय़ातील सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाऱया एका पोलीस कर्मचाऱयांचा कोरोनाचे उपचार सुरू असताना बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने बळी गेलेल्या पोलीसांची संख्या आता तीन झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 24039
बरे झालेले 13805
उपचारात 9341
मयत 893








