प्रतिनिधी / सांगली
रविवारी जिल्हय़ात नवे 399 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्येने अकरा हजाराचा टप्पा पार केला आहे. तर 345 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना जिल्हय़ातील 19 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्हय़ात 465 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 109 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन 109 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 65 तर मिरज शहरात 44 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रातील आता सर्वच भागात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तसेच मोठय़ाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर नऊ हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या सहा हजार 266 झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच 290 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 290 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात सात, जत तालुक्यात नऊ, कडेगाव तालुक्यात 17 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 37, खानापूर तालुक्यात 13, मिरज तालुक्यात 52 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 16, शिराळा तालुक्यात 22, तासगाव तालुक्यात सर्वाधिक 70 आणि वाळवा तालुक्यात 47 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 290 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 19 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 19 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. 71 आणि 52 वर्षीय महिलेचा तर आणि 56 आणि 67 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील 90 वर्षीय महिलेचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील तिघांचा मृत्यू झाला. 70, 61 आणि 42 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील 65 आणि पलूस तालुक्यातील वसगडे येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोळी येथील 67 वर्षीय महिलेचा ऍपेक्स हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. समडोळी येथील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात येथे मृत्यू झाला. तासगाव निमणी येथील 69 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. बावची येथील 58 वर्षीय महिलेचा श्वास हॉस्पिटल येथे. कवठेपिरान येथील 75 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे. तासगावमधील 68 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. आरग येथील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे. तसेच कुपवाड येथील 75 वर्षीय व्यक्तीचा गोटखिंडी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 19 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 465 झाली आहे.
345 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 345 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण जरी मोठय़ासंख्येने वाढत असले तरीसुध्दा बरे होणाऱया रूग्णांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सहा हजार 981 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही सुधारत आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 11396
बरे झालेले 6981
उपचारात 3950
मयत 465








