सांगली जिल्हय़ातील 34 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 312 वाढलेः ग्रामीण भागात 698 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 1010 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 27 हजार 691 झाली आहे. तर दिवसभरात 712 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 34 आणि परजिल्हय़ातील चौघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 1038 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 312 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन रूग्ण मोठय़ासंख्येने वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात तब्बल 312 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 223 तर मिरज शहरात 89 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 11 हजार 714 झाली आहे.
ग्रामीण भागात 698 रूग्ण वाढले
शुक्रवारी ग्रामीण भागात 698 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 16, जत तालुक्यात 55, कडेगाव तालुक्यात 69 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 73, खानापूर तालुक्यात 68, मिरज तालुक्यात 125 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 59, शिराळा तालुक्यात 37, तासगाव तालुक्यात 93 आणि वाळवा तालुक्यात 103 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 34 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 34 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील तिघांचा, कडेगाव तालुक्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन जणांचा, मिरज ग्रामीण भागातील तीन जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील तीन जणांचा, तासगाव तालुक्यातील पाच जणांचा, शिराळा तालुक्यातील पाच जणांचा आणि वाळवा तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण 34 जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1038 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्हय़ातील चौघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया चौघांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हय़ातील कराड येथील एका व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 151 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
712 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्हय़ात शुक्रवारी 712 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 16 हजार 903 झाली आहे. जवळपास 60 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हय़ात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हय़ाला हा मोठा दिलासा मिळत आहे.
3098 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हय़ात शुक्रवारी तीन हजार 98 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 1390 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 708 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 1010 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 27691
बरे झालेले 16903
उपचारात 9750
मयत 1038








