प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यात रविवारी पहाटे 51 हजार लसीचे डोस आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा वेगाने लसीकरण सुरू झाले आहे. सोमवार आणि मंगळवारी पूर्ण क्षमतेने लसीकरण होणार आहे. जिल्हÎात आजअखेर पाच लाख सहा हजार 765 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणांचा एक मोठा टप्पा पार पडला आहे. शासनाकडून जिल्हÎाला लसीचे डोस अपुऱया प्रमाणात प्राप्त होत असल्याने लसीकरणात खंड पडत आहे. रविवारी 24 हजार 488 जणांना लस देण्यात आली.
जिल्ह्यात प्रथम लसीकरण वेगाने सुरू झाले होते. पण त्यावेळी नागरिकांचा प्रतिसाद अल्प होता. पण त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद वाढला आणि नेमके लसीकरणासाठी लागणारी लसच शासनाकडून खंडीत स्वरूपात पुरवठा होऊ लागली त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला अनेकवेळा ब्रेक बसला आहे. शनिवारी लस संपल्याने अनेकांना विना लस घेता घरी जावे लागले पण रविवारी मध्यरात्री जिल्हÎाला 51 हजार लसीचे डोस मिळाल्याने जिल्हÎात सोमवार आणि मंगळवार पूर्ण क्षमतेने लसीकरण होणार आहे. जिल्हÎात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिकेच्या दवाखान्यातून मोफत लसीकरण केले जाते तर खासगी दवाखान्यात या लसीसाठी पैसे घेतले जातात.
आजपर्यंत जिल्ह्यात करण्यात आलेले लसीकरण असे हेल्थ केअर वर्कर यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रंट वर्कर यांनाही जवळपास दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 65 वर्षावरील व्यक्तींनाही मोठÎाप्रमाणात लस देण्यात आली आहे. सध्या 45 वर्षाच्या वरील नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून लसीचे डोस अपुरे असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला होता. आता 51 हजार लसीचे डोस आल्याने ही लसीकरण मोहिम मोठया वेगाने सुरू राहणार आहे. यापुढील काळासाठी पुन्हा एकदा शासनाकडे मोठयाप्रमाणात लसीचे डोस मागणी करण्यात आले आहे. लवकरच ही मागणीही पुर्ण होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. जिल्हÎात दररोज सरासरी 20 ते 24 हजार लोकांचे लसीकरण होते. त्यामुळे आगामी दोन दिवसासाठी लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आणखीन 50 हजार लोकांचे लसीकरण तातडीने होईल असे त्यांनी सांगितले.








