प्रतिनिधी / सांगली
मंगळवारी जिल्ह्यात 924 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे 697 रूग्ण वाढले . जिल्ह्यात आजअखेर 20 हजार 588 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पण उपचार सुरू असताना 28 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील 26 आणि परजिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्ह्यात 1161 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 158 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात मंगळवारी 158 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 100 तर मिरज शहरात 58 रूग्ण वाढले आहेत. गेल्या चार दिवसांपासुन सांगली शहरात मोठयासंख्येने रूग्ण वाढत होते. पण सोमवारी आणि मंगळवारी त्याला बेक बसला आहे. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 12 हजार 510 झाली आहे.
ग्रामीण भागात 539 रूग्ण वाढले
मंगळवारी ग्रामीण भागात 539 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 44, जत तालुक्यात 64, कडेगाव तालुक्यात 58 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 68, खानापूर तालुक्यात 49, मिरज तालुक्यात 53 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 54, शिराळा तालुक्यात 34, तासगाव तालुक्यात 31 आणि वाळवा तालुक्यात 84 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 26 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर कुपवाड येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा, मिरज ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील चौघांचा तर तासगाव तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील दोन जणांचा आणि वाळवा तालुक्यातील सहा जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 26 जणांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1161 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवे 16 रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील नवीन 16 रूग्ण जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे पाच, बेळगावचे सहा, सोलापूरचे दोन आणि मुंबईचे तीन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर परजिल्ह्यातील 972 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 524 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 288 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आजअखेर 160 जणांचा मृत्यू झाला आहे.
20 हजार 588 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात मंगळवारी 924 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पुन्हा एकदा नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत चालला आहे. जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 20 हजार 588 झाली आहे. जवळपास 65 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्ह्याला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी सलग तीन दिवस वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे हा एक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
2481 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात मंगळवारी दोन हजार 481 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 651 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 1830 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 697 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 30719
बरे झालेले 20588
उपचारात 8970
मयत 1161
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








