प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात नवीन 580 रूग्ण वाढले. तर दिवसभरात त्यापेक्षा अधिक म्हणजे 813 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 23 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्हÎात 1354 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. तर जिल्हÎात आजअखेर 28 हजार 97 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
महापालिका क्षेत्रात 122 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात 122 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 66 तर मिरज शहरात 56 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता रूग्णसंख्या हळू हळू कमी होत चालली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मनपा क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 14 हजार 520 झाली आहे.
ग्रामीण भागात 458 रूग्ण वाढले
बुधवारी ग्रामीण भागात नवीन 458 रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 43, जत तालुक्यात 38, कडेगाव तालुक्यात 35 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 19, खानापूर तालुक्यात 26, मिरज तालुक्यात 64 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 40, शिराळा तालुक्यात 35, तासगाव तालुक्यात 63 आणि वाळवा तालुक्यात 95 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 23 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 23 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील एकाचा, मिरज तालुक्यातील एकाचा, पलूस तालुक्यातील दोघांचा, शिराळा तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील चौघांचा आणि वाळवा तालुक्यातील तब्बल पाच जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजअखेर 1354 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्याततील नवीन 25 रूग्ण दाखल
परजिल्ह्याततील नवीन 25 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे 17 बेळगावचे तीन, सोलापूरचा एक, आणि सातारा येथील चार जणांचा समावेश आहे. आजअखेर परजि जिल्ह्याततील 179 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. परजिल्हÎातील 1194 जणांच्यावर जिल्हÎात उपचार करण्यात आले त्यामध्ये 758 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 257 जणांच्यावर उपचार सुरू आहेत.
28 हजार जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात बुधवारी 813 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 28 हजार 97 झाली आहे. जवळपास 75 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच सलग 11 दिवस कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे. त्यामुळे ही अत्यंत चांगली गोष्ट घडत चालली आहे.
3127 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात बुधवारी तीन हजार 127 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील एक हजार 229 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 898 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 580 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 36814
बरे झालेले 28097
उपचारात 7363
मयत 1354