सांगली प्रतिनिधी
आर्थिक वर्ष एप्रिल 2020 ते मार्च 2021 मध्ये जीएसटीचे कलेक्शन 734 कोटी इतके होते . यंदाच्या वर्षी एप्रिल2021 ते मार्च 2022 चा महसूल हा रु 900 कोटी इतका झाला. अशी माहिती केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आली. मागील वर्षी पेक्षा आता जीएसटी महसुलात सुमारे 136 कोटीची म्हणजेच 18 % पर्यंत वाढ झाली आहे.
जानेवारी 2020 पासून सुरु झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड कोरोनाच्या दुसऱ्या / तिसऱ्या लाटेमुळे जून 2021 व डिसेंबर 2022 चा अपवाद वगळता कायम राहिला. आता वाढीचा दरात वृद्धी होऊन जिल्ह्याच्या मार्च 2022 च्या जीएसटी संकलनात मध्ये मागील मार्च 2021 च्या तुलनेत मोठी वाढ आहे. मागील वर्षी मार्च 2021 या महिन्यात जीएसटीचे महसूल रु. 70 कोटी इतके होते. तर आता मार्च 2022 चा महसूल हा रु 91 कोटी इतकाच नोंदला गेला. जीएसटी महसुलात सुमारे 21 कोटीची म्हणजेच 30% वृद्धी झाली आहे.









