373 कोरोनामुक्तः सांगली शहरात 106 वाढलेः वाळवा आणि खानापूर तालुक्यात 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. सलग दुसऱया दिवशी जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन 830 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 106 तर मिरज शहरात 51 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 373 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात सात हजार 53 रूग्ण आहेत. सलग दुसऱया दिवशी वाळवा आणि खानापूर तालुक्यात 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत चालली आहे.
महापालिका क्षेत्रात 157 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. ती दररोज सरासरी 200 च्या जवळ पोहचली आहे. रविवारी महापालिका क्षेत्रात नवीन 157 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 106 तर मिरज शहरात 51 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 19 हजार 982 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 80 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
वाळवा आणि खानापूर तालुक्यात 100 पेक्षा अधिक रूग्ण
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर तब्बल 673 रूग्ण वाढले आहेत. वाळवा आणि खानापूर तालुक्यात सर्वाधिक असे 100 पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. खानापूर तालुक्यात 106 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात 102 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 87 तर कडेगाव तालुक्यात 54 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 38, तासगाव तालुक्यात 79 रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात 46 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 10 तर मिरज तालुक्यात 97 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 54 रूग्ण आढळून आले आहेत.
14 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सलग दुसऱया दिवशी 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक अशा चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरातील दोन आणि मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. खानापूर आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण दगावले आहेत. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी दोन रूग्ण दगावले आहेत. मिरज तालुक्यात एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 932 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.70 टक्के झाला आहे.
363 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 363 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 61 हजार 95 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 52 हजार 110 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 830
उपचारात 7053
बरे झालेले 52110
एकूण 61095
मृत्यू 1932
रविवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 87
कडेगाव 54
खानापूर 106
पलूस 38
तासगाव 79
जत 46
कवठेमहांकाळ 10
मिरज 97
शिराळा 54
वाळवा 102
सांगली शहर 106
मिरज शहर 51
एकूण 830
लसीकरण
आजचे लसीकरण 1337
आजअखेर लसीकरण 397944








