2300 कर्मचारी लसीकरणात : दररोज सरासरी 19 ते 20 हजार जणांना लस : गती वाढतेय
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम आता जिल्ह्यात गती घेऊ लागली आहे. सोमवार अखेर जिल्ह्यात 4 लाख 20 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. 377 लसिकरण केंद्रावर 2300 इतके अधिकारी, कर्मचारी अव्याहतपणे काम करत आहेत. दररोज सरासरी 19 ते 20 हजार लोकांना लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी पासून कोव्हिड-19 चे लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यानंतर दिनांक 01 फेब्रुवारी पासून प्रंटलाईन वर्कर म्हणजे महसूल, पोलीस, सफाई कामगार व कोव्हिडमध्ये प्रत्यक्ष काम करणारे यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर 1 मार्चपासून 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरणाच्या तिसऱया टप्यात 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात 377 लसीकरण केंद्रे सुरु असून याठिकाणी जवळपास 2300 वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. आज अखेर 4 लाख 19 हजार 944 लसीकरण करण्यात आलेले आहे. दररोज सरासरी 19 ते 20 हजार लसीकरण होत आहे.
वॉर रूमला दररोज 300 कॉल
जिल्हा परिषदेमध्ये सुरू करण्यात आलेली वॉर रुम 24 तास कार्यरत असून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाचे सनियंत्रण येथून केले जाते. बेड मॅनेजमेंटसाठी वेगळे कॉल सेंटर असून गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यात येतात. दिनांक 15 फेब्रुवारी 1 पासून बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर सुरु असून आतापर्यंत 1 हजार 940 कॉल आले असून गेल्या 10 दिवसापासून दररोज 300 कॉल येत आहेत. या कॉल सेंटरवर रुग्णांचे नातेवाईक बेड उपलब्धतेसाठी, शंका निरसनासाठी, कोविड 19 बद्दल माहिती इ.साठी फोन करतात.
याशिवाय हॉम आयसोलेशनमध्ये असणाऱया रूग्णांनाही दररोज या सेंटरमधून कॉल करून त्यांची विचारपूस आणि उपचाराची माहिती घेतली जाते.
कॉलसेंटर्सची यंत्रणा सज्ज
विविध कॉलसेंटर्स दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे
बेड मॅनेजमेट कॉल सेंटर 0233-2374900, 2375900,2377900,2378900,2378800,2377800
गृह अलगीकरण 0233-2625700, 2622700, 2623300, 2623500, 2623700, 2620100, 2624500, 2622299, 2375400
महापालिका बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर 0233-2375500, 2374500,
तालुकास्तरीय कॉल सेंटर
जत 02344-247229, आटपाडी 02343-221717, कडेगाव 02347-295201, खानापूर 02347-274001, 276056, क. महांकाळ 02341-222031, पलूस 02346-228400, तासगाव 02346-242328, वाळवा 02342-224475, शिराळा 02345-221108








