प्रतिनिधी / सांगली
जिल्हÎात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्हÎात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. उपचार सुरू असणाऱया 28 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर नवीन रूग्णवाढीचा वेगही वाढला आहे. नवीन एक हजार 309 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 360 तर मिरज शहरात 262 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 550 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात दहा हजार 509 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 632 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. आज महापालिका क्षेत्रात नवीन 632 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 360 तर मिरज शहरात 262 रूग्ण वाढले आहेत.









