प्रतिनिधी/सांगली
आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सुरु झालेल्या मान्सूनने बुधवारीही जिल्हाभर दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या 24 तासात कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना गती आली असून आतापर्यतं 70 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
मान्सूनपूर्व जोरदार पाऊस झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतींना गती आली होती. खते, बियाणे खरेदीसाठीही शेतकऱयांची झुंबड उडाली होती. राज्याच्या अनेक भागात मान्सून सक्रीय झाला असला तरी जिल्हÎ पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण होईपर्यंत शेतकऱयांनी पेरण्यांची घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. परिणामी पावसाच्या प्रतिक्षेत पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाने सुरुवात केली. शिराळÎापासून दुष्काळी जतपर्यंत सर्वत्र समाधानकारक सरी सुरू झाल्याने पेरण्यांना गती आली आहे. शिराळा तालुक्यात भात, जतमध्ये बाजरी तर वाळवा, मिरज, पलूस, शिराळासह अन्य भागात सोयाबीन, मका पेरणी चांगली झाली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात 30.4 मि. मी. पाऊस
जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 30.4 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासातील व कंसात आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. मिरज 22.4(97.2), जत 4.9(107.1), खानापूर-विटा 14.7(34.1), वाळवा-इस्लामपूर 11.8(57.9), तासगाव 14(84.7), शिराळा 11.9(93.6), आटपाडी 3.9(57.2), कवठेमहांकाळ 30.4(80.7), पलूस 10.7(91.6), कडेगाव 10.9(65.8).
खरीपाच्या 25 टक्के पेरण्या ,शिराळÎात 75 टक्के भातपेरणी आवरली
समाधानकारक पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातपेरण्यांना गती आली आहे. खरीप हंगामाच्या 2 लाख 77 हजार 686 हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 70 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. 5 हजारहून अधिक हेक्टरवर नव्याने ऊस लागवडही झाली आहे. शिराळा तालुक्यात 13581 हेक्टरपैकी 11779 हेक्टरवर भाताची लागवड पूर्ण झाली आहे. धुळवाफेने भाताच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. तर वाळवा आणि पलूस तालूक्यातही काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार भातपेरणी सुरू आहे. आवर्षणप्रवण भागातील महत्वाचे पीक असणाऱया बाजरीची 49 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
शिराळा, कवठेमहांकाळ, तालुक्यात मका पेरणीला गती आली आहे. आतापर्यंत सरासरी 31 टक्के मका पेरणी झाली आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि खानापूर तालुक्यात तालुक्यात काही ठिकाणी उडीद पेरण्या झाल्या आहेत. भुईमूग, मूग, सूर्यफूल, तूर आदी पिकांची पेरणीही चांगली झाली आहे. आडसाली पूर्व हंगामी ऊसाची लागवाडही सुरू झाली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर उसाच्या भरणी आटोपत्या घेत शेतकऱयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे.








