प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात आजअखेर कोरोना लसीकरणाचा पहिला डोस 4 लाख 82 हजार 345 जणांना दिला आहे तर दुसरा डोस 53 हजार 736 जणांना दिला आहे. अशा एकूण 5 लाख 36 हजार 81 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.
जिल्ह्याला दि. 27 एप्रिल 2021 रोजी लस प्राप्त न झाल्यामुळे बुधवार दि. 28 एप्रिल 2021 रोजी कोरोना लसीकरण होवू शकणार नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे.








