241 कोरोनामुक्तः सांगली शहरात 112 वाढलेः खानापूर तालुक्यात 66 वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी कोरोनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर रविवारी नवीन 487 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 112 तर मिरज शहरात 51 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात तीन हजार 806 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 163 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. रविवारी सांगली शहरात तब्बल 112 तर मिरज शहरात 51 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 18 हजार 814 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 85 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 324 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर 324 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये खानापूर तालुक्यात सर्वाधिक असे 66 रूग्ण आढळून आले आहेत. आटपाडी तालुक्यात नऊ रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 15, कवठेमहांकाळ तालुक्यात नऊ, मिरज तालुक्यात 61 तर शिराळा तालुक्यात 14 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 43 तर वाळवा तालुक्यात 54 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 14 तर तासगाव तालुक्यात 39 रूग्ण वाढले आहेत.
पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी उपचार सुरू असणाऱया पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील दोघांचा तर कडेगाव मधील एकाचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात आणि मिरज शहरात प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे आजअखेर एक हजार 846 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.65 टक्के झाला आहे.
241 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 55 हजार 554 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 49 हजार 902 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 487
उपचारात 3806
बरे झालेले 49902
एकूण 55554
मृत्यू 1846
रविवारीचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 09
कडेगाव 43
खानापूर 66
पलूस 14
तासगाव 39
जत 15
कवठेमहांकाळ 09
मिरज 61
शिराळा 14
वाळवा 54
सांगली शहर 112
मिरज शहर 51
एकूण 487









