जिल्हय़ातील 23 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 346 वाढलेः ग्रामीण भागात 590 रूग्ण वाढलेः आठ पोलीस पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सांगली
शनिवारी जिल्हय़ात नवीन 936 रूग्ण वाढले आहेत. तर 754 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 25 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 23 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 821 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रूग्णांची संख्या 12 हजार 376 झाली आहे.
महापालिका क्षेत्रात 346 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शनिवारी नवीन 346 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 247 तर मिरज शहरात 99 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 10 हजार 131 झाली आहे.
ग्रामीण भागात 590 रूग्ण वाढले
शनिवारी ग्रामीण भागात 590 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 31, जत तालुक्यात 33, कडेगाव तालुक्यात 59 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 44, खानापूर तालुक्यात 58, मिरज तालुक्यात 68 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 45, शिराळा तालुक्यात 25, तासगाव तालुक्यात 69 आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 158 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 23 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 23 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 43 आणि 65, वर्षीय व्यक्तांचा तर 54,56, 70 आणि 83 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आटपाडीतील दोघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 30 आणि 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कवलापूर येथील दोघांचे मृत्यू झाले. त्यामध्ये 65 वर्षीय व्यक्ती आणि 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तोंडोली येथील 65 वर्षीय व्यक्ती, विटा येथील 90 वर्षीय व्यक्ती, माडग्याळ येथील 65 वर्षीय व्यक्ती यांचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. काशीदवाडी येथील 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला.
मिरज येथील 50 वर्षीय महिला, कांचनपूर येथील 76 वर्षीय व्यक्ती यांचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणदी येथील 62 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. ऐतवडे खुर्द येथील 53 वर्षीय व्यक्ती चा आधार हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. आमणापूर येथील 56 वर्षीय महिलेचा सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुंडल येथील 57 वर्षीय महिलेचा भगवान महावीर हॉस्पिटल येथे. सुभाषनगर येथील 52 वर्षीय व्यक्तीचा, हिंगणगाव येथील 45 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला. अंजनी येथील 83 वर्षीय महिलेचा घाटगे हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 23 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 821 झाली आहे
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील हासूर येथील 82 वर्षीय व्यक्तीचा काराना रूग्णालय येथे. कराड येथील 90 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 135 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
दोन अधिकारी आणि सहा पोलीस पॉझिटिव्ह
पोलीस दलात कोरोनाने मोठय़ाप्रमाणात शिरकाव केला असून शनिवारी जिल्हय़ातील दोन अधिकारी आणि सहा पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत. आजअखेर 22 पोलीस अधिकारी आणि 197 पोलीस बाधित झाले आहेत. यातील 13 पोलीस अधिकारी आणि 111 पोलीस कर्मचाऱयांनी कारोनावर यशस्वी मात केली आहे. तर दोन पोलीसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
12 हजार 376 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही आता चांगलीच वाढत चालली आहे. शनिवारी एकाच दिवसांत 754 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील 12 हजार 376 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 22306
बरे झालेले 12376
उपचारात 9109
मयत 821