सांगली/प्रतिनिधी
जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर या तालुक्यांमधील 25 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राज् महामार्ग 8 व प्रमुख जिल्हा मार्ग 17 अशा 25 रस्त्यांचा समावेश आहे.
पावसामुळे,पूरामुळे,घाट भागात व इतर तत्सम कारणांमुळे (उदा. पूल बुडीत होणे, पूलाचा भराव खचणे इ.) वाहतूक खंडीत/बंद पडलेल्या रस्त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
शिराळा तालुका – वाकुर्डे बुद्रुक शिराळा कांदे मांगले सागांव ठाणापुडे राज्यमार्ग 159 वरील कांदे मांगले दरम्यान मांगले पुल, रामा.क्र.191 पासून नांदगाव पिशवी बांबवडे सरुड सागांव मांगरुळ रस्ता रामा.क्र. 397, शिराळा फकीरवाडी मांगले काखे रस्ता प्रजिमा 7 काखे – मांगले पूल, शिराळा तालुक्यातील इग्रुळ भाटशिरगांव कांदे सांवर्डे प्रजिमा 6 कांदे पुल जोड रस्ता, आरळा शित्तुर प्रजिमा क्र.113 आरळा पुल, करमाळा शिराळा शिंगटेवाडी मांगले प्रजिमा क्र.8 शिंगटेवाडी पुल यांचा समावेश आहे.
वाळवा तालुका – वाकुर्डे बुद्रुक शिराळा कांदे मांगले सागांव ठाणापुडे राज्यमार्ग 159 कि.मी.46/300 लहान पुलाचे जोडरस्ते पाण्याखाली, राज्यमार्ग 159 कि.मी.52/500 मधील येलूर गावाजवळील फरशी पुल, रामा क्र.150 ताकारी पुल, ऐतवडे खुर्द कुंडलवाडी तांदुळवाडी रस्ता प्रजिमा क्र.10 वरील निलेवाडी गावाजवळ ऐतवडे पुल, रस्ता प्रजिमा क्र.10 वरील तांदुळवाडी गावाजवळ, वाळवा पडवळवाडी बावची नागांव ढवळी शिगांव रस्ता प्रजिमा – 11 शिगाव गावाजवळ, शिरगांव अहिरवाडी रस्ता प्रजिमा – 117 आहिरवाडी गावाजवळ
पलूस तालुका – देवराष्ट्रे कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली आमणापूर अंकलखोप नागठाणे वाळवा बोरगांव रस्ता रा मा 158 वरील आमणापूर पुल, रा मा 158 वरील बुर्ली आमणापूर ओढा, उरण इस्लामपूर जुनेखेड नवेखेड प्रजिमा 36 वरील पुणदी पुल, आमणापूर येळावी तासगांव रस्ता प्रजिमा क्रं.91, प्रजिमा 96 वरील नागठाणे गावाजवळील मौल्याचा ओढा, नागराळे ते शिरगाव फा्टा प्रजिमा 32, बम्हनाळ ते भिलवडी प्रजिमा क्रं.121,
मिरज तालुका – खंडाळा पळशी कराड सांगली रा. मा. क्रं. 142, अंकली जुनी धामणी बामणी कृष्णाघाट ढवळी म्हैसाळ रस्ता प्रजिमा क्रं. 44 वरील स्वामी नाल्यावरील पुल, माधवनगर पदमाळे मौजे डिग्रज ब्रम्हनाळ प्रजिमा क्रं 42, मौजे डिग्रज नावरसवाडी खोतवाडी नांद्रे प्रजिमा 123
खानापूर तालुका – कमलापूर रामापूर रस्ता प्रजिमा क्र.77 मधील येरळा नदीवरील फरशी पूल
Previous Articleविद्यार्थ्यांना दिलासा! पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात : वर्षा गायकवाड
Next Article सैन्य भरती सीईई पुढे ढकलली








