19 कोरोनामुक्त : महापालिका क्षेत्रात 59 वाढले; ग्रामीण भागात 127 वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात तब्बल पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झाला आहे. एकाच दिवसांत नवीन 186 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 59 रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 127 रूग्ण वाढले आहेत. तर अवघे 19 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महापालिका क्षेत्रात तब्बल 59 रूग्ण वाढले.
गेल्या पाच महिन्यापासून कोरोना आटोक्यात होता. पण पुन्हा एकदा त्याचा कहर सुरू झाला आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 59 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 40 तर मिरज शहरात 19 रूग्ण वाढले आहेत. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर 17 हजार 58 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यामध्ये 95 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचारात अवघे दोन ते अडीच टक्के रूग्ण आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर 127 रूग्ण वाढले.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. यामध्ये जत तालुक्यात 26 रूग्ण वाढले आहेत. तर मिरज तालुक्यात 22 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 17 तर वाळवा तालुक्यात 20 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात तीन रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 16 तर कडेगाव तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात सहा तर तासगाव तालुक्यात पाच रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे मोठ्या संख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. ही चिंतेची बाब आहे.
अवघे 19 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शुक्रवारी उपचार सुरू असणारे 19 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये 49 हजार 417 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 46 हजार 979 रूग्ण बरे झाले आहेत. तर आजअखेर एक हजार 771 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर 3.65 टक्के इतका झाला आहे.
| नवे रूग्ण | 186 |
| उपचारात | 667 |
| बरे झालेले | 46979 |
| एकूण | 49417 |
| मृत्यू | 1771 |








