आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील यांची ग्वाही
प्रतिनिधी / सांगली
काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे. ती यशस्वीपणे पार पाडून सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.
आमदार मोहनराव कदम यांच्या जागी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जतचे आमदार विक्रम सावंत हे जबाबदारी पार पाडणार आहेत. तर दादा घराण्यातून युवा नेते विशाल पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये काँग्रेस पक्ष मजबुतीने निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे सावंत व पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.








