वार्ताहर / पुलाची शिरोली
पंतप्रधान आवास मोफत घरकुल योजनेमध्ये खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत. या वंचित लोकांची यादी जो पर्यंत तयार होत नाही तोपर्यंत यादी शासनाकडे पाठवू नये. अशी मागणी भारतीय जनता पक्ष शाखा शिरोलीच्यावतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ग्राम विकास अधिकारी ए. एस . कठारे यांना सतीश पाटील व संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये सुमारे दोन ते अडीच हजार लाभार्थीकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. यामध्ये दारिद्र रेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात अशा लाभार्थीची यादीत नांवे नाहीत. प्रसिद्ध झालेल्या यादी मध्ये सुमारे १५ ते २० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या खरे लाभार्थीची नावेच वगळण्यात आली आहेत. संबंधित लाभार्थी यादी ऑनलाइन पाठवण्यासाठी एका विशेष व्यक्तीची निवड करण्यात आली होती. मग खऱ्या लाभार्थींची नावे का व कशी ? गायब झाली असा प्रश्न या निवेदनात विचारण्यात आला आहे.
असे वगळण्यात आलेले लोकांची संपूर्ण माहिती घेऊनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा व गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे दाद मागण्याचा इशारा भाजप शाखेच्या वतीने देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या यादीमध्ये गावातील पन्नास टक्के लोकांची यादी काही तांत्रिक कारणामुळे अपलोड झालेले नाही. ती संपूर्ण यादी स्विकारणेत यावी असे पत्र तत्कालीन गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना ग्रामपंचायतीने पाठवलेले आहे.
ग्रामविकास अधिकारी ए.एस.कठारे.
यावेळी भाजप माजी शहराध्यक्ष संभाजी भोसले, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश पाटील ,किरण कौंदाडे, दिलीप शिरोळे, सागर कौंदाडे, उत्तम पाटील, संपत संकपाळ, संदीप पोर्लेकर आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









