आम आदमी पार्टीची मागणी,
प्रतिनिधी/मिरज
मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासह सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सांगली जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आधी महापूर, नंतर कोरोनामुळे लोकडाऊन आणि आता परतीच्या पावसाने शेती व्यवसायासह शेतकरी उध्वस्त झाला असल्याने राज्यातील आघाडी शासनाने मदत देण्यास दिरंगाई करू नये, दिल्ली सरकार प्रमाणे महाराष्ट्रात प्रति हेकटरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.