प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा तालीम संघाच्यावतीने राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील कुस्तीगीर पुरुष व महिला कुस्तीगीराची निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली. यात निवड झालेले 3 कुस्तीगीर या तिसऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी खेळणार आहेत. या स्पर्धा अमेठी (उत्तरप्रदेश) येथे संपन्न होणार असून, या स्पर्धा ग्रीकोरोमन व फ्रीस्टाईल या 2 प्रकारामध्ये होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य संघ निवडीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने ४ व ५ सप्टेंबर रोजी इंदापूर जि. पुणे येथे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कुस्तीगीर परिषदेच्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून निवड झालेल्या कुस्तीगीरानी सहभाग घेतला होता.
या महाराष्ट्र राज्य निवड संघामध्ये जिल्ह्यातील कुस्तीगीर पुरुष गटात पै. प्रथमेश गुरव, शिराळा यांची ७४ कि. फ्रीस्टाईल मध्ये व पै. नाथा पवार -बेनापूर यांची ६७ कि. ग्रीकोरोमन मध्ये महिलामध्ये पै.कु. प्रतिक्षा बागडी-तुंग हिची ७६ कि. फ्रीस्टाईल मध्ये निवड झाली आहे. हे तिनही मल्ल महाराष्ट्र राज्य संघातून दि. १६ व १७ संप्टेंबर २०२१ रोजी अमेठी (उत्तर प्रदेश) येथे संपन्न होणाऱ्या ३ ऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे मध्ये सहभागी होत आहेत. या मल्लांवर जिल्ह्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Articleभरधाव कारची दुचाकीला धडक
Next Article सांगली : कुपवाडमध्ये बागबगीचा लवकरच विकसीत होणार








